आठवण मजला येते ग
आठवण मजला येते ग
नोकरीच्या उद्देशाने मुलगा बाहेर राहतो त्याला आईची आठवण येते
आई आठवण तुझी येते ग
कसा येऊ मी गावा तुझ्या
मन माझ झुरतय तुझ्यासाठी
कुशीत मजला घे ना तू
मला शिकाया तू
किती कष्ट घेतलेस गं
जातानी शिकवणीला
खाऊ घातलेस मला तू
पैसा मिळवाया मी
गाव आपला सोडला ग
पण एकही क्षण मी
विसरलो तुला ना आई
आठवण खुप येते ग मला
भेटाया जीव माझा तळमळला
कधी भेट होईल माहित नाही
कंठ माझा भरून आला
घाम गाळून कितीही कमावलं
तरी गाव कसा विसरेन मी
तुझी आठवण भारी येई
विसरूनी ना सगळे जाईन मी
सुखाचे दिवस आज आले
परतुनि ये तू माझ्या गावा
तू आता विसावा घे
सेवा करू दे या लेकराला
