STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

आत्महत्या एक सामाजिक कलंक

आत्महत्या एक सामाजिक कलंक

1 min
241

आत्महत्या का तुलाच वाटे 

शेेवटचा आधार!

कधी तरी मनालाही शिकवी

हट्टाला माघार!!

दारिद्र्य ,पीडा, दु:ख,अपमान

दाबून ठेवू नको तू उरी!

सारं हितचिंतका सांंगून जरा

हलका होशिल तू तरी!!

आत्महत्या नाही रे होत

समस्यांवरी रामबाण उपाय!


भ्याडपणाची लाभेे संज्ञा

दुर्लभ जन्म ही वाया जाय!!

चौ-यांशी लक्ष योनीनंतरच

मानव जन्म होई प्राप्त!

रडूून खुप थकल्यावर सारे 

तुला विसरतील रे आप्त!!

कुणा प्राप्त होते लोणी

मुखी कुणाच्या पडे अंगार!


नकारात्मकता,निराशा दे टाकून

जसे काही टाकाऊ भंगार!!

पराधीन जगी आहे खरा

पुत्र रे मानवाचा!

दोषी ठरवित दैवाला त्यागिशी

देह का नवसाचा!!


मरण आज झालंय स्वस्त

कर विचार थोडा!

जगणं झालय महाग जणू

शर्यतीतला घोडा!!

काळ्या मेघांनाही लाभते रे

रुपेरी किनार !

निराशेच्या तमात तुला किरण

आशेचा दिसणार!!


सुखामागे दु:ख जणू

पाठशिवणीचा खेळ!

मनासारखे घडायला ही

यावी लागते की वेळ!!

तमात घनी करी राज्य

शुक्र होत राजा!

खिन्न मना देई उभारी।

वाजवित बाजा!!


प्रत्येकाला छळती समस्या

देत जिवंतपणी मरण!

टक्कर दे निर्भिडपणे

नको रचू स्वत:ची सरण!!

दैन्य,दु:ख,अपयश,आजारपण प्रेमभंग,

ब्ल्यूव्हेल,सेल्फी, कर्जबाजारीपण!

कटकट,भांडण,संताप,अविश्वास,

हुंडा आत्महत्येसी ठरती कारण!!

विष प्राशन,जाळून घेणं,

विहीर,नदीत जीव देणे!

स्वत:फास लावून घेणं,

रेल्वे खाली जीव देणे!!


अशा अघोरी मरणाला शेवटी

अर्थ काही रहात नसतो!

त्रिशंकू समान जिवात्मा

अधांतरी लटकत बसतो!!

मरायचेच तर शिखर एव्हरेस्ट

चढून येवो खुशाल मरण!

मारून दहा देशद्रोही लढलास

तर होईल रे तुझे स्मरण!!



Rate this content
Log in