STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आसवांची गर्दी

आसवांची गर्दी

1 min
313

अंधार होता जीवनी माझ्या

एकटी होते तेथे मी

श्वास घेत होते मी

पण हुंदका तो माझा नाही


आसवांची गर्दी माझ्या मनी होती

दुःख म्हणुनी किती ही जीवघेणी

भावनांचा कल्लोळ होतं मी माझ्या

व्यक्त कोणाजवळ करेल मी


बोलणारे खूप होते

शब्द अपुरे पडत होते

अंगावरी झेले ज्यांचे ते शब्द होते

गुलाम मी मात्र नव्हते पण बंदिस्त झाले ते शब्द होते


सगळे सोडून पाश सारे मोकळा श्वास घेतला मी

सुटले त्या जाचातून शब्द मोकळा केला

नाद हा घुमाऊनी सोडले मी पाश सारे

बिनधास्त झाले मी जगण्या मी मोकळी झाले


Rate this content
Log in