STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

आसक्ती माझी मलाच

आसक्ती माझी मलाच

1 min
99

आसक्ती माझी मलाच 

तू माझाच रे आहे दिलबरा

येता जवळ देशील ना

तू हातात माझ्या हात खरा..

    

 गीत तुझेच ओठांवर येता

मनी उमटले अनंत सूर

नजरेत नजर मिळताच

गंधाळली ही आपली प्रीत...


सोबत नव्हते कुणी माझ्या

सख्या त्या रम्य सांजवेळी

अलगद हळू तू आलास 

बसला माझ्या जवळी...


नयनांतील चांदण्यांनी 

उजळली ही चांदरात

हार कुणाची शामिल

सांग कुणाची होई जीत...


पहाटेची गुलाबी थंडी हवा 

दाट पडले गाढ धुके

नाते आपले अतुट

प्रितीत जाहले संवाद मुके...


कानावर पडे माझ्या सख्या 

सुरेल ती दूर शहनाई

जणू धुंदी तुझ्या नशेची 

फुलली जीवनी नवलाई...


Rate this content
Log in