आस तुझ्या भेटीची
आस तुझ्या भेटीची
विठू माऊली
व रखुमाई!
कसे हो होऊ
मी ऊतराई?
उभे आहात,
विटेवरती!
युगे झालीत,
अठ्ठाविस ती!!
जरी असाल,
विटेवरती!
ध्यान सदैव,
भक्तावरती!!
भक्त असती,
वाटेवरती!
पंढरपुरी,
होईल दाटी!!
माळ गळ्यात,
वैजयंतीची!
विठू रखमा,
माथ्यावरती!!
असे पताका,
खांद्यावरती!
भक्ती भावाने,
भागवताची!!
मुखे वदती,
नाम, अभंग!
असे साथीला,
टाळ मृदंग!!
झिम्मा फुगडी,
कुणी खेळती!
किर्तनरंगी,
कुणी रंगती!!
चित्र असेच,
वसले मनी!
नजरकैद,
ती विसरूनी!!
आस भेटीची,
चुकली वारी!
नाहीच आलो,
तुझिया दारी!!
अरे विठ्ठला,
सावर आता!
महामारी ही,
आवर आता!!
रखुमादेवी,
तू तरी सांग!
भेटून तुम्हा,
फिटू दे पांग!!
म्हणे रखमा,
"मी उभी, युगे
ही अठ्ठाविस,
विठ्ठला साठी"!!
"झालास कसा,
तू कासावीस?
झाले नाहीत,
तितके मास"!!
"सोडू नकोस,
भेटीची आस!
मनात ठेव,
फक्त विश्वास"!!
"सोडू नकोस,
नामाचा ध्यास!
मनात हवा,
फक्त विश्वास"!!
