आरसा
आरसा
1 min
252
गड आमचे वैभव शोभते
आणि किल्ले आरसा
पिढ्यानपिढ्या संस्कृतीचा
जपतो आम्ही वारसा
गड आणि किल्ल्यामध्ये
अभेद्य अशी सुरक्षा
असो कितीही बलाढ्य
शत्रूपासून होत होती रक्षा
शिवनेरीच्या तख्तावर
कीर्ती ज्यांची गाजे
जन्मले इथेच प्रजापालक
"छत्रपती शिवाजी राजे"
खिंडीत "बाजीप्रभूंनी"
शत्रुची काढली धिंड
इतिहासात अजरामर झाली
पवित्र "पावनखिंड"
महाराष्ट्राची भूमी झाली
गड, किल्ल्यांमुळे पावन
वस्तू, शिल्पाचे , पर्यटनस्थळ ते
घडविते संस्कृतीचे दर्शन
