आरसा मनाचा....
आरसा मनाचा....
1 min
241
आरसा मनाचा
पाहा डाेकावून,
दिसतं त्यात
पाहा मन लावून...
आरसा मनाचा
खाेटं बाेलत नाही,
कुठेही फिरतं मन
असतं दशदिशादाही...
आरसा मनाचा
प्रतिबिंब पडत असते,
मनाच्या गाभाऱ्यात
प्रतिक्रिया उमटत जाते...
आरसा मनाचा
वारंवार पाहत राहावा,
मनाच्या क्रियाकर्मात
सतत ताे तपासावा...
