STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

आरोग्य हीच संपत्ती

आरोग्य हीच संपत्ती

1 min
252

लवकर उठावे, प्रभात समयी

योगासनाच्या लावाव्या सवयी

हरवायचे असेल रोगांना जर

व्यायामात घालू पहाटेचा प्रहर//१//


लहान, थोर सारेच जण

घेऊ आता आपण योगशिक्षण

तंदुरुस्त राहील शरीर आणि मन

आपले शरीर संपदा ठेऊया जपून//२//


पचनक्रिया होईल योगाने सोयीची

योग सवय असावी माणसाची

योग सतत करावा जरूर

राहतील रोग सारे कोसो दूर//३//


योगाचे सर्व शिकून घ्यावे धडे

खाऊ नये काही उघडे पाघडे

योग केल्याने येईल निद्रा शांत

होईल आरोग्य सारे निवांत //४//


Rate this content
Log in