आरं जा
आरं जा
1 min
155
शेती करतो आम्ही
काय पाप करत नाही राव,
खाऊ नको लई भाव! आरं जा
तिचं लगीन कुणासोबत बी लाव
काय समजलं समाजानी आम्हा
शेतकरी काय भिकारी नाहीत राव,
आरं जा! खाऊ नको भाव
तिचं लगीन नोकरदारासोबत लाव
थोडं थांबा जरा खेळू द्या
नियतीला दाहीक वर्षाचा डाव,
होतेन तुमचे नोकरदार बेजार
येणार तेव्हा शेतीला भाव
आरं जा! खाऊ नको भाव
तिचं लगीन नोकरदारासोबत लाव
बघितलं नाहीस तू त्या कष्टाला
नोकदाराचं नको काढू नाव,
आरं अशाची आम्हा
काही गरज नाही राव
आरं जा! खाऊ नको भाव
तिचं लगीन नोकरदारासोबत लाव