आरक्षण प्रणेते
आरक्षण प्रणेते


लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज
सर्वसामान्य बहुजन समाजाचे स्वाभिमान...
ऐक्य,परस्पर प्रेम,विश्वास, चिकाटी गुण
शिक्षण-आरक्षण प्रणेते प्रेरणादायी मान...
समानतेसाठी झगडणारे असे लोकराजा
भिनले श्वासाश्वासात थोर त्यांचे विचार...
होऊन मुक्त गुलामगिरीच्या विळख्यातून
समाजास वैचारिक जगण्याचा आधार...
वंचितांचे जीवनदायी शिक्षकवेत्ता महान
लोक कल्याणकारी दुःखितांचे अभिमान...
विषमता हटवून उध्दारिले गोरगरिबांस
आदराचे झाले मनी आधारस्तंभ बहुमान...
विचारवंताच्या विचारांची गरज ओळखून
बदलाचे भिडू दे पापास सकारात्मक वारे...
धार्मिक दोषाचा निरर्थक झुंडबळी झुगारुनी
नैतिक समाजभान भिनवू श्वासाश्वासात सारे..