आपल्यातला स्वच्छंदी मी
आपल्यातला स्वच्छंदी मी
माझ्यासारखा मीच आहे,
मीच मला खास आहे..
कोणी सोबत असो वा नसो
माझीच मला साथ आहे...
सगळ्यांनी प्रेम करा स्वतःवर,
कुणावर अवलंबून राहू नका..
जगणे मुश्किल झाले आहे,
तरीही हरून जाऊ नका..
मतलबी दुनिया ही सारी,
त्यात गुरफटून जाऊ नका..
आई वडिलां सारखे दैवत नाही,
त्यांना विसरून जाऊ नका...
दुनियादारी त हरवला असाल,
तर जरा स्वतः मध्ये डोकावून पहा..
स्वच्छंदी मनाला आपल्या
थोडा मोकळा श्वास घेऊ द्या...
शोध घ्या तुमच्या अंतर्मनाचा,
त्यातल्या कलागुणांना वाव द्या..
सोशल मीडिया सारख माध्यम वापरून,
आपल्या मनाला शब्दांद्वारे व्यक्त करा...
