आपल्या प्रेमाने स्नेहपुर्वक
आपल्या प्रेमाने स्नेहपुर्वक
भाऊबीजेच्या चंद्राला करते मी,
भावांसाठी ओवाळणी,
सुखी ठेव सर्व माझ्या भावांना
मी पाच भावांची आहे लाडकी बहीन....
आहे माझे सद्गुनी साधेभोळे भाऊ
माया ,करुणेचे मोठे मानकरी,
माझी आहे चंद्रा तुला एकच विंनती
नको कोणतेच तयावर संकटे भारी.....
सु:खात दु:खात सदा मज सहारा तयांचा
धैर्य देवूनी वसले मनी, माझे भाऊ,
जीवनात आले कित्येक संकटे,
सारले त्यांनी पाठीशी उभे राहूनी.....
माझे मित्र आईवडिल माझे भाऊ
मी आहे एक काजळीची ज्योती,
आपल्या प्रेमाने स्नेहपुर्वक
ओतप्रोत भरली माझी झोळी,....
कोणते पुण्यकर्म केले होते मी
परमार्थ करणारे मिळाले मज भाऊ,
मजपासूनी अंधकाराची सावली ही,
न थांबता दूर नेती माझे भाऊ,....
या कलीयुगाच्या माया नगरीत
प्रेमळ भाऊ घेत असती क्वचितच जन्म,
स्वता:ला भाग्यवान समजते मी,
अन घेते पदरात आनंदमय प्रेम भरून,...
भाऊबीजेच्या या पावन पर्वावर,
प्रेमाने अक्षवण करिते मी भावांना,
भावांच्या संसारात आनंदाची पायाभरनी,
त्यांना खुप खुशी मिळावी भरभरूनी,
फुलापरी फुलावे फळावे क्षितीजावरती...
