आपलीच माणसे...
आपलीच माणसे...
या जीविताच्या भुतलावर.
जरी मानव एकटा आला तरी.
त्याला पावला पावलाला
साथीची गरज असते.
अगदी मरणाच्या शेवटल्या क्षणापर्यंत.
या मायावी दुनियेत.
मानव एकटा राहू शकत नाही.
उलटून त्याला स्व:तासाठी.
त्याच्या हक्कांची माणसे.
जन्मभरासाठी जोडावी लागतात.
तीच जिवाभावाची माणसे.
जीवनाच्या सुख दु:खाच्या वाटेवर.
भक्कम आधार असतात.
ही आपलीच माणसे विविध रुपात
आपल्याला सदोदित आधार देतात
आई बाबा भाऊ बहीन मित्र मैत्रिण.
पती पत्नी गुरु समाज आपलीच माणसे.
ह्याच आधारामुळेच जीवनाचा संघर्ष
जिंकण्यास मदत होत असते.
कधी कधी हा भक्कम आधारा.
गैरसमजुती मुळे कोलमडला जातो.
अन् आपलीच माणसे.
आपल्या पासुन दुरावतात.
त्यासाठी कधीच गैरसमजूत न करता.
आपणच आपलीच माणसे त्याची नाते.
समजूतदारपणाने जपावी लागतात.
