"आपली संस्कृती"
"आपली संस्कृती"
गडकिल्ले आहेत आपली संस्कृती
जाणावी तिची आपण महती
शिवनेरी जन्म घेई बाळ शिवाजी
सिंहगडासाठी लढला वीर तानाजी
रायगडी आमचा राजा बसे सिंहासनी
बाजीप्रभू मुळे पन्हाळा येतो ध्यानी
गडकिल्ल्याचे पावित्र राखा हो तुम्ही
महाराष्ट्राची शान राखु तुम्ही आम्ही
प्रतापगड, सिंधुदुर्ग ,जंजिरा, तोरणा
ताठ आहे त्यामुळे मराठी बाणा
जावे एकदातरी जन्मी यासर्व गडा
अभिमानाने होती ओल्या डोळ्याच्या कडा
गडकिल्ले आहेत आपली शान
आपली संस्कृती आहे हो महान
राखावा त्याचा सगळयांनी मान
तरच मिळेल जगात सन्मान
तरच मिळेल जगात सन्मान
