आपला मोठेपणा
आपला मोठेपणा
1 min
210
बघते मी या धरतीवर
जो तो मोठेपणाच्या गोष्टी करतो
स्वतःची चूक न दाखवता
दुसऱ्यास कमी लेखतो
परिपूर्ण या धरतीवर असा कोणीच नाही
आपला मोठेपणा दाखवण्यात धन्यता हे मानतात
माहिती का वाईट कधी कोणाला म्हणू नये
कारण इथे सर्वगुणसंपन्न असा कोणी नाही
आता असे की स्वतःला नेहमी तुम्ही कमी लेखा
कारण इथे जो तरला तो शहाणा ठरला
