आनंदली धरणीमाय
आनंदली धरणीमाय
1 min
171
झाले ओलेचिंब गड्या
फुटे अंतरी पाझर
जीवा ओणवा तों गेला
डोळ्या लागे माझ्या धार!!१!!
शेतकरी बीज पेरे
अशी बरसात कर
माया मनातून सदा
फुटो आनंद अंकुर!!२!!
मायी तहान भागता
अंतराच्या पाझराने
गंगा यमुना वाहती
मज पाहे आनंदाने!!३!!
झाली न्हाती धुती आता
शालू हिर्वा पांघरला
जना मनात बैसली
श्वास आनंदे सोडला!!४!!
कोकिळेची पहा सारी
कुहूं कुहूं ते संपली
ढग कडाडता नभी
ईज थुई थुई नाचली!!५!!
वेली आनंदाने साऱ्या
गेल्या असे गगनात
गंध फुलला आनंदे
संतदासाच्या मनात!!६!!
