STORYMIRROR

Suvarna Thombare

Others

3  

Suvarna Thombare

Others

आनंद जीवनाचा

आनंद जीवनाचा

1 min
571

बालपणीचा काळ

होता अनमोल ठेवा

निरागस ते जीवन

वाटे आता हेवा.


आईची ममता

वडिलांची माया

आशिर्वाद घ्यावा

चरणी ठेवूनी काया.


गंगेसम निर्मळ 

अंतरंगी चे भाव

दिन, दुःखीतांचे 

पुसाण्या अश्रू धाव.


भुकेल्यास देई अन्न

असे धर्म मानवाचा

पुण्य अपार मिळे

हाच आनंद जीवनाचा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन