आंबेडकर जीवनगाथा
आंबेडकर जीवनगाथा


मुर्दाड समाजाला केले हक्कापूर्ती जागृत
आचार विचारातून शिक्षण केले सुसंस्कृत
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विचार होते त्यांचे
शिक्षणातून त्यांनी उद्धार केले आमुचे
जातिधर्माचा कधी केला ना त्यांनी गर्व
लढून त्यांनी नियम मिळवून घेतले सर्व
भीमाच्या शिक्षणातून समाज गेला खोल
बुद्धविचार होते त्यांचे किती खरे अनमोल
दलितांचा केला बाबासाहेबानी हो आदर
त्यांच्या विचारांची करूया आपण कदर
भ्रष्टाचाराला असे नेहमी त्यांचा विरोध
मनात असे त्यांच्या नेहमी स्वातंत्र्याचा शोध
मिळवून दिले समाजाला त्यांचे अधिकार
राज्यघटना लिहून बनले घटनेचे शिल्पकार