STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

आंबा...!

आंबा...!

1 min
813

आंबा आला बाजारात

चर्चा घुमू लागली

घरा घरात...!


या आंब्याची

नखरेल वरात

अंबानींच्याच सदा दारात....!


आमच्या साठी

कळकट मळकट

कमाल बळकट...!


चांगल्या झाडावरती

रसाळआंब्यासाठी

पहिली माकडांची धाड...!


जळफळाट होता

मन म्हणते

त्यांनाच आहेत भलते द्वाड...!


आता रहावत नाही

पाहून नखरेल साज

पाऊस पडता याचा उतरेल माज...!


मग गल्लो गल्ली

फिरेल ओरडत

आंबे घ्या आंबे घ्या...!


डझनाचा भाव

येईल सत्वर शेकड्यावर

बसून खाऊ मग बाकड्यावर...!


आज म्हंटले नुसते पाहू

जाता जाता नेत्र सुख घेऊ

उद्याच मग चांगला बघून खाऊ...!


शेकड्याचा भाव डझनाला

उगाच दर वेगळा वजनाला

म्हंटले जावे तडक भजनाला....!


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍