STORYMIRROR

Stifan Khawdiya

Others

4  

Stifan Khawdiya

Others

आम्ही भारतीय

आम्ही भारतीय

1 min
235

आम्ही भारतीय आम्ही भारतीय

नांदू एकजूटीने मायभूमीत 

नको जातीयवाद आपापल्यात

नको व्यर्थ राजकारण समाजात


अभिमान बाळगु भारतीय होण्याचा

करु सन्मान आपल्या मायभुमीचा

माणूसकीचा संदेश ठसवू मनामनात

आदर्श अवघ्या जगात भारताचा


एकीच्या बळावर आपण बांधव 

करु संरक्षण आपल्या देशाचे  

नाश करु आतंकवादी शत्रुंचा  

शक्तीशाली पुत्र आपण भारताचे


वसा धरुनी देशभक्त पूर्वजांचा

एक प्रयत्न करुया स्वदेशासाठी

साक्षर भारत प्रगतीशील भारत 

झटूया आपण देशाच्या उन्नतीसाठी 


शेतकरी आत्महत्या स्त्री बलात्कार 

नष्ट करू या देशांतील अत्याचार

खंबीरतेने देवूनी लढा भ्रष्टाचारला

देशातील कलंकीतांचा करु संहार 


माझा देश भारत मी पुत्र भारताचा  

हिच भावना ठसवा आपल्या हृदयात 

करु कर्तव्य आपआपल्या परीने

राहू जागृत सदैव देशाच्या सेवेत


आम्ही भारतीय नागरिक स्वाभिमानी 

रहातो गुण्यागोविंदाने मायभुमीत 

एकमेकांना करुनी सहाय्य 

देवू मानवतेचा संदेश सा-या विश्वात 


Rate this content
Log in