STORYMIRROR

Varsha Chopdar

Others

4  

Varsha Chopdar

Others

आम्ही Active तंत्रस्नेही

आम्ही Active तंत्रस्नेही

1 min
494

तंत्रस्नेही व्हा, तंत्रस्नेही व्हा

शिक्षकांसाठी आला आदेश

MSCIT नसेल, तर वेतनवाढ

बंदचा मिळाला संदेश


तंत्रस्नेही म्हणजे काय?

डोके गेले भंडावून

नुसतीच शोधाशोध सगळीकडे

अध्ययन-अध्यापन गेले थंडावून


वृषालीताईंनी आणला आशेचा किरण

कानाकोपऱ्यातील शिक्षकांना दिले आमंत्रण 

व्हिडिओ, ब्लॉग यांची भरवली कार्यशाळा 

विविध गुगलअॅप तंत्रज्ञानाचे दिले शिक्षण 


खऱ्या अर्थाने आनंददायी शिक्षणाची 

झाली छान सुरुवात 

तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना

नेले अनुभवाच्या जगात 


कथा, कविता, व्हिडीओ  

यांचे उपक्रम झाले सुरु 

शिक्षक व विद्यार्थ्यांच्या भावविश्वात 

नाचू लागले फुलपाखरू 


नियोजनबद्ध आणि शिस्तीचे

वैशिष्ट्य असे खास 

Paperless work, विविध स्पर्धांमध्ये 

पर्यावरणपूरकचा असतो अट्टाहास


आम्ही Active तंत्रस्नेही 

मिळाली चालना विचारांची

तंत्रज्ञानाच्या मदतीने 

घालवू निशा उद्याची


Rate this content
Log in