आम्ही आमचे राजे
आम्ही आमचे राजे
1 min
421
ना गुलाम त्यांचे म्हणतील ते करणारे
आम्ही आमच्या मर्जीने मनस्वी वागणारे
विचार स्वातंत्र्य प्राणपणाने जपणारे
राजे आमच्या मनाचे स्वातंत्र्य मागणारे
-१-
पाहिले ते आपलीच तुंबडी भरणारे
वैर ही पराकोटीचे चारित्र्य डागणारे
मेघ प्रतिभेचे सुखस्वप्नांना शिंपणारे
बोल कठोर अपेश जिव्हारी लागणारे
-२-
कळसूत्री पराधीन असती जाणणारे
हितास बाधक ठरता युती तोडणारे
गद्दारीला नसे क्षमा सजा घडविणारे
अंकित ना कुणाचे मंडलिक ना होणारे
-३-
