आमचा विठ्ठल
आमचा विठ्ठल
1 min
259
आमचा विठ्ठल
उभा विटेवरी
हात कटेवरी
ठेवुनिया
आमचा विठ्ठल
कसा हा सावळा
गळ्यात ह्या माळा
तुळशीच्या
आमचा विठ्ठल
भेटतो आषाढी
वारकरी दिंडी
काढुनिया
आमचा विठ्ठल
आहे बघा शांत
मनी नाही भ्रांत
कुणाच्याही
आमचा विठ्ठल
दैवत राज्याचे
रक्षण प्रजेचे
त्याच्या हाती
आमचा विठ्ठल
पंढरपूराला
भावतो सर्वाला
मनोमनी
