आली मकरसंक्रांती
आली मकरसंक्रांती
1 min
155
हवेत गारवा वाढत गेला
सकाळ सारी प्रकाशमय
पक्षी हवेत स्वैर झाले
दिस हा मकर संक्रांतीचा आला।। 1।।
सर सर हवेत ऊडे
वेगाने पुढे जात
पळापळीच्या या शर्यतीत
आनंद येई मनी खेळात हार जीत।।2।।
तीळाचे तीळ गुळाचा गोडवा
सदा मुखी हसत रहावे
शिकवण मिळे या संक्रांतीत
सण आला मकरसंक्रांतीचा ।।3।।
