Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratima Kale

Others

4  

Pratima Kale

Others

आली आली हो दिवाळी

आली आली हो दिवाळी

1 min
402


काय राव,आली आली हो दिवाळी

शाळांनाही आता सुट्टी हो लागली

कामाची मग लगबग करतांना हो

अचानक,मग मज चक्कर आली ||१||


खिडकी घेतली मग पुसायला

पाणीच गेले हो टाकीचे संपून

कसेबसे भरून आणले पाणी

धुळीने गेली मी भारीच रंगून ||२||


घराची सफ सफाई केली सुरू

त्यात पाहुण्याचीच हो लगबग

काय करू अन् काय नाही हो

होती सख्यांनो माझी तगमग ||३||


तुमची सर्व तयारी पाहून मग

मलाच हो हुरूप आला खूप

काव्यसंमेलन संपताच आता

पालटेन मी कर्तव्याने हो रूप ||४||


थकवा सारा बाजूला हो सारून

आनंदासाठी करे कार्य हळूहळू

तुमच्या संगती रमताना आनंदते

मन माझे ताजे लागते पळूपळू ||५||


या ग सख्यांनो तुम्ही माझ्या घरी

करू दिवाळी आनंदाची साजरी

एकमेकांना भेटून अंतकरणातून

प्रत्येकाची होईल खरीच हसरी ||६||


फटाक्यांना तिलांजली हो देवून

गोरगरिबांना नित्य मदत करून

पर्यावरण रक्षण व्रत अंगिकारून

दिवाळी करू साजरी कर्तव्यातून ||७||


सुखाची पणती लावू गरिबा घरी

मदतीचा हात देवून प्रत्येकाला

सुखाची,समृद्धीची वाट दावू

हुरूप येईल कार्य करण्याला || ८||


Rate this content
Log in