आले आभाळ भरून
आले आभाळ भरून
1 min
125
आले आभाळ भरून
डोळे पाणावले पाहून
भेगाळलेली भुई भरेल
सरीचा तो लेप लावून
सुकलेल्या या डोळ्यात
ते पाणी कुठून आले
पाहता रूप तुझे मेघा
मन आनंदाने न्हाले
आशेचा कवडसा दिसे
मेघा तुझ्या गर्जनाने
सोडलेल्या देहात प्राण
आला तुझ्या आगमनाने
किती दिवस वाट पाही
आली ना कधी तुझी स्वारी
लेकरांची कुस रिकामी
असा होतो बाप मी लाचारी
नव्हती तुझी सोबत तेव्हा
झालो मी कर्ज बाजारी
फुटेल तोही डोंगर आता
तू जो आलास माझे दारी
आलास जरा तर थोडं
चार दिवस राहून जा
वावरात नाचून बागडून
मुखी थोडं हसू देऊन जा
