आला श्रावण आला
आला श्रावण आला
1 min
392
उपवासाची परवणी देत
सणांचा शुभसंकेत देत
सर सरींनी बरसत
आला श्रावण आला ।।1।।
ओढ त्या गोपालकाल्याची
बाळ गोपाळांच्या हौसेची
उत्सवांच्या त्या परंपरेची
साद देत श्रावण आला ।।2।.
मन रमले श्रावणात
मन भिजले भक्तीत
मन बहरले शंभुच्या उपवासात
असा नटलेला बहरलेला श्रावण आला ।।3।।
