आला आला पाऊस आला
आला आला पाऊस आला
1 min
350
आला आला पाऊस आला
विजेच्या आवाजाने घाबरून
काळ्या ढगांतून पळून
बघा लाडका, पाऊस आला!।।
आम्हा गोपाळांचा लाडका तो
येतो कसा सर सर सर
त्याच्या येण्याने शाळेतून
धूम ठोकतो भर भर भर।।
आला पाऊस आला पाऊस
येउदेत दररोज तुझ्या सरी
मग आम्हा पोरांची शाळेची
आपोआप थांबेल वारी।।
नको शाळा नको अभ्यास
नाही आम्हा पुस्तकाची गोडी।
भिजतो आम्ही सारे पावसात
आवडीने करतो कागदाची होडी।
पावसा तू ये शाळेच्या वेळेस
मिळेल मग दररोज सुट्टी
जर तू नाही आलास तर
मी करेन तुझ्याशी कट्टी।।
