Ravindra Gaikwad

Others

4.0  

Ravindra Gaikwad

Others

आक्रोश

आक्रोश

3 mins
128


दिड दिवस शिकून शाळा

अण्णाभाऊ साहित्यरत्न झाला,

का नाही मिळाले सांगा

भारतरत्न माझ्या अण्णाला...


जन्मूनी अस्पृश्य जातीत

अठरा विश्व दारिद्र्यात,

नाव कमविले जगात

असा साहित्येकार नाही झाला...

का नाही मिळाले सांगा भारतरत्न अण्णाला...


हाती तलवार ती लेखणी

मारली डफावर थाप त्यांनी,

गेले रशियास विमानातूनी

अण्णा कळणार कधी या देशाला...

का नाही मिळाले सांगा भारतरत्न अण्णाला...


शाहिर,लेखक, कामगार नेता

दिग्दर्शक,निर्माता, अभिनेता,

मोठा विद्वान, विचारवंत होता

ना होणार,न कोणी असा झाला...

का नाही मिळाले सांगा भारतरत्न अण्णाला....


जातीवाद, विषमतेला

भांडवलशाही नी अन्यायाला,

अण्णाभाऊनी विरोध केला

लौकिक अण्णांचा जगभर झाला....

का नाही मिळाले सांगा भारतरत्न अण्णाला.,..


अनेक निघाले चित्रपट

साहित्य अभ्यासती विद्यापीठं,

परकीय भाषेत झाले अनुवादित

प्रणाम शतदा त्या लोकशाहीराला...

का नाही मिळाले सांगा भारतरत्न अण्णाला...


किर्ती अण्णाची आज गाऊ

खरे भारतरत्न हे अण्णाभाऊ,

जन्मशताब्दी वर्षानिमित्त

हवेच भारतरत्न अण्णाला...


-----


उठा बंधुंनो, उठा जोमाने

तुम्हा सर्वांना हे कळावं,

साहित्यरत्न अण्णाभाऊंना

हे भारतरत्न मिळावं..


हे जन्मशताब्दी वर्ष

झाला किती मनी हा हर्ष,

चला उठू करू संघर्ष


यश लढ्याला आपल्या यावं..

साहित्यरत्न अण्णाभाऊंना हे भारतरत्न मिळावं..


महान साहित्यकार, लोकशाहीर

किर्ती अण्णाची अजरामर

लेखनी अण्णाची तलवार


नातं त्यांच्याशी आपलं जुळावं...

साहित्यरत्न अण्णाभाऊंना हे भारतरत्न मिळावं...


पाठपुरावा सारे करू

सारे एकजुटीने उभारु,

जयजयकार अण्णांचा करू


गगन सारं हे दुमदुमून जावं

साहित्यरत्न अण्णाभाऊंना हे भारतरत्न मिळावं...


अण्णाभाऊंची महती गाऊ

बोला सारे जय अण्णाभाऊ

चला मुंबई, दिल्ली जाऊ


शासनाला बळ हे कळावं...

साहित्यरत्न अण्णाभाऊंना हे भारतरत्न मिळावं...


नाही झाला न होणार

असा महान साहित्यकार

विद्वान, लोकशाहीर


नमन अण्णाला कर हे जुळावं...

साहित्यरत्न अण्णाभाऊंना हे भारतरत्न मिळावं...


-----


आक्रोश आमचा, तुम्हीच ऐका

येतोय आवाज घराघरांतनं..

का नाही मिळाले सांगा

साहित्यरत्नाला भारतरत्न...


दिड दिवस शिकून शाळा

साहित्याचा फुलविला मळा,

लोकशाहीर अण्णा झाला

वाटे आश्र्चर्य जगताला

जगभर किर्ती माझ्या अण्णाची, असा झाला हा साहित्यरत्न...


भारतरत्न मिळावे म्हणून

सारा समाज एकवटून,

केली मागणी, निवेदन

साऱ्या प्रसारमाध्यमावरुन

लिहून रक्तानं पाठवले पत्र सांगा पडले काय कमी प्रयत्न...


उच्चवर्णीय ब्राह्मणांना

राजकारणी, चमचांना,

गायक, वादक, खेळाडूंना

भारतरत्न कसं मिळे यांना

संसदेत आवाज उठवा हवे अण्णाला भारतरत्न..

का नाही मिळाले सांगा साहित्यरत्नाला भारतरत्न...


-----


मलाही आज झुलायचय

आठवणीच्या हिंदोळ्यावर,

मजा येईल खरी सजनी

सोबत तू असशील तर


विसरून जावू जीवन दुःख

सुखाचे सारे मोजू क्षण,

देऊघेऊ आनंदी आनंद,

जीवनाचं करूया सोनं


आठवणीच्या हिंदोळ्यावर

मला हवी तुझीच साथ,

दोघेच या जीवनात सदा

दोघेच नित्य सुखदुःखात


मी किती गाऊ गुण तुझे

तुला काय सांग हवे,

तुला देतो चार झोके

तू ही मला चार झोके द्यावे


येती साऱ्याच आठवणी

झाला आनंद मज फार,

झुलायचे दोघे आपण

आठवणीच्या हिंदोळ्यावर


-----


चाल : बडी मस्तानी है,मेरी महेबुबा...


अण्णाभाऊंची जयंती आज, चला करुनी श्रृंगार साज

चला जाऊ जयंतीला, चला सारे चला...।।


नाचू गाऊ सारे या शुभदिनी

अण्णा भाऊंची गाऊया गाणी...२

ढोल ताशांच्या या गजरांनी

गेलं अस्मान हे दणाणुनी...२

या रे सारे या, सामील सारे व्हा, मिळून आज सारे चला.... चला जयंतीला....।।


नाही तरली पृथ्वी शेषावर

आपण तारली ती या हातावर..२

दिन दलित, बहूजन, कामगार

आहे पृथ्वी यांच्या तळहातावर..२

सांगण्या हे अण्णा जन्मा आला, साऱ्या या जगाला...।।

चला जाऊ जयंतीला, चला सारे चला..


किर्ती अण्णाची साऱ्या या जगात

साहित्य रत्न ते साहित्यसम्राट..२

आज जयंती माझ्या अण्णाची

महान शाहीर तो शाहीरात..२

वंदू अण्णाला, बंधुनो चला, बंधू-भगिनी सारे चला, चला जयंतीला...।।


-----


चाल : तुझे भुलना तो चाहा...


किर्ती आहे अण्णाची, साऱ्या या जगात.

गातो मी गुणगान, माझ्या या गितात...।।१।।


अण्णा भाऊंनी हो,शाहीरी केली ,

लिहील्या कथा, कादंबऱ्या, लावणी गाजविली.

मिळविला मान, त्यांनी साहित्यात...।।२।।


दिडदिवस अणांनी, शिकूनीया शाळा,

फुलविला अण्णानी,हा साहित्य मळा,

दिले संघर्ष बळ,आम्हा ह्रदयात...।।३।।


संयुक्त महाराष्ट्र चळवळ, अण्णाभाऊंनी केली,

महाराष्ट्राला मिळवूनी, मुंबई त्यांनी दिली,

घालीला त्यांनी घाव, जग बदलण्यात...।।४।।


काँम्रेड अण्णा भाऊ, तो कामगार नेता,

शौषणाविरुद्ध लढणारा, संघर्षवीर होता,

मिळविला मोठा मान, त्यांनी साहित्यात...।।५।।


अण्णा भाऊंची सांगा ,गावावी किती किर्ती

म्हणे दलितांच्या हातावर, तरली आई ही धरती

न झाला,न कोणी होणार, असा लोकशाहीर इथं...।।६।।


-----


कोरोना..कोरोना .कोरोना

लोक फारच भयभीत झालेत,

खरचं या जगावर साऱ्याच

किती वाईट दिवस आलेत..


लॉकडाऊन, क्वारंटाईन सॅनिटायजर,मास्क,

शाळा, मॉल, हॉटेल, रस्ते बंद

बंद झाला श्वास,

बाहेर निघायची हिंमतच नाही

घरात सारेच कंटाळून गेलेत...


मास्क लावायचं,वाफ घ्यायचं

घरातच राहायचं,हात धुवायचं

बंदी, मंदी, बेरोजगारीत

कसं जगायचं, काय खायचं?

आकडे सारे लाखात गेलेत

कोरोनानं कित्येक मेलेत...


बंद रेल्वे, विमान बंद

बंद वाहतूक, व्यापार

खूप घेतय खबरदारी

सांगतय खूप सरकार

सारेच धंदे बंद झाले

लोक अण्णाला मोताद झालेत...

कोरोनानं सारेच भयभीत झालेत

अन् खरच वाईट दिवस आलेत...


Rate this content
Log in