आक्रोश
आक्रोश


आक्रोश आमचा, तुम्हीच ऐका
येतोय आवाज घराघरांतनं..
का नाही मिळाले सांगा
साहित्यरत्नाला भारतरत्न...
दीड दिवस शिकून शाळा
साहित्याचा फुलविला मळा,
लोकशाहीर अण्णा झाला
वाटे आश्र्चर्य जगताला
जगभर किर्ती माझ्या अण्णाची,
असा झाला हा साहित्यरत्न...
भारतरत्न मिळावे म्हणून
सारा समाज एकवटून,
केली मागणी, निवेदन
साऱ्या प्रसारमाध्यमा वरुन
लिहून रक्तानं पाठवले पत्र
सांगा पडले काय कमी प्रयत्न...
गायक,वादक, खेळाडूंना
भारतरत्न कसं मिळे यांना
संसदेत आवाज ऊठवा
हवे अण्णाला भारतरत्न..
का नाही मिळाले सांगा
साहित्यरत्नाला भारतरत्न...