STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

आजोबा

आजोबा

1 min
11.4K

तुम्ही शिकविले आम्हा

       आयुष्य हे कसे जगावे

तुम्ही शिकविले आम्हा

      ही माणुसकी कशी जपावी

आमच्या इवल्याशा बोटांना

     आधार तुम्ही दिला

टाकले आम्ही पाऊल पहिले

       होता तुम्ही सोबती आमच्या

बाबा जेव्हा ओरडती अंगावर

      कुशीत तुमच्या दडलो आम्ही

सुंदर होत्या त्या आठवणी

      सुंदर होते क्षण ते

सोबत तुमची असताना

       कायम हरवायचे मन आमचे

दाखवलेल्या तुमच्या वाटेवरून

     आम्हाला चालायचे आहे

दिलेल्या तुमच्या शिकवणीत

      शिकायचे आम्हाला आहे

सगळ्यांना सांभाळतांना आज

    हे जग आम्हाला जिंकायचे आहे

कारण ही तसेच आहे

     आयुष्य कसं जगायचं आणि जगू द्यायचं

तुम्ही आम्हाला शिकवलं

कसा माणूस कसावा, कशी असावी माणुसकी

   हे आज तुम्ही आम्हाला शिकवल


Rate this content
Log in