आजोबा माझा अभिमान...
आजोबा माझा अभिमान...
1 min
134
आवडीपेक्षा नावडींची माझी यादी
तुम्ही माझ्यापेक्षा मायेने हो जपली
ती मोठी असण्याची तक्रार कधी नाही
समजदारीचा सद्गुण तुमची शान
तुमच्यावर गेल्याचे माझे सतत गुणगान
वाचन लिखाणाची आवड अशी जडली
नाव माझं आज तुमचा आशीर्वाद स्मरला
समाजसेवेचा पहिला आदर्श देऊ केलात
आजोबा माझा अभिमान तुम्ही झालात
नि माझ्या स्वप्नांना नवदिशाचं वरदान दिलंत
व्यक्तिमत्वाचे पहिले चरित्र म्हणून गाजलात
गुरुजींची नात म्हणून मिळालेला नावलौकिक
अवगुणांनाही माझ्या आता बाधत नाही
