STORYMIRROR

Meena Mahindrakar

Others

3  

Meena Mahindrakar

Others

आजकाल ---

आजकाल ---

1 min
11.9K

आजकाल दुरावत चालले

माणसे एकमेकांपासून

आणि नष्ट झाली प्रीती

त्यांच्या मनातून------

कधीचाच खुन झाला

'माणुसकी,' नावाच्या शब्दाचा

खोल खोल गाडून

मनाच्या एका कप्यात----

आता प्रत्येक जण जगतो

फक्त स्वतः पुरते...

रस्त्यावरून चालताना

ओळखीचा चेहरा

भेटलाच तर

हसू नावाचं कृत्रिम रबर

ताणून बसविले जाते

मरगळलेल्या चेहऱ्यावर

आणि मोठ्या कष्टाने

शब्द बाहेर पडतात ओठातून

हॅल्लो हाय, जास्त झाल तर 

कसे काय?

नाही तर दुरूनच बाय


Rate this content
Log in