आजीची आठवण
आजीची आठवण
1 min
824
यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील
यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील
हो?
1 तरी 2 तरी 3 तरी असतील हो
4 तरी 5 तरी 6 तरी
बुलबुल हो
हेच ते मधूर बडबड गीत
आजी गुण गुणयाची
आजीची ही गोड आठवण
मनी राहिली आहे साठवण
आजी माझी साधी निर्मळ
खूपच निरागस प्रेमळ
आजी मला म्हणे चिमणी
तर दादा असे तिचा ससुल्या
सारे तीचे आपुले
नाही कोणी दुजे
आजी माझी शिक्षिका
हेच गुण मी हेरले
मीही झाले गुरू
तिचे ज्ञानदानाचे कार्य
आजून चालू आहे
आजी माझी हृदयात वसली आहे
