आजी
आजी
1 min
335
संस्कारांची आशावेल
ममतेचा एक झरा,
आयुष्याच्या ओंजळीत
आजीरूपी असे हिरा..
तिच्या पदराची ऊब
ममतेची खाण असे,
अंतरीच्या गूढ छटा
एक कप्पा व्याप्त असे...
आजी माझी होती छान
तिच्या सुखद स्मृतींना,
आसवातून आळवता
मुक्त वाट भावनांना...
डोळे सहज मिटता
तिच्या कुशीत विसावे,
आयुष्याच्या परीघास
सुखक्षणी रिझवावे....
यावी परत फिरून
आजी माझी अशी,
आठवणीत निरंतर
हीच मातृत्वाची कुशी...
