आजघर माजघर
आजघर माजघर
1 min
687
आजघर आजघर वाडा माझा ग चौसोपी
त्यात दिसते देखणी कोपऱ्यात एक कुपी
आजघर माजघर माजघरात पलंग
पोराबाळांच्या कल्याने वाडा होतसे ग दंग
आजघर माजघर माजघरात कोनाडा
कोनाड्याने त्या जपला स्वभाव रावांचा रांगडा
आजघर माजघर माजघरात उखळ
जसे बसतील घाव होई कांडप मंगळ
आजघर माजघर माजघरात जाजम
ऐसपैस बसुनी घ्या असे पोरीला उमज
आजघर माजघर माजघरात ग माडी
झाली बाई रात्र आता लावा अलगद कडी
