आजची नारी
आजची नारी
नवयुगाची प्रणेती मी
आहे कर्तव्यदक्ष नारी
समर्थ पेलण्या आकाश माझे
आणि कर्तव्ये सारी
धावपळीच्या यूगात अशी
चाललीय माझी कसरत
कधी कॉम्पुटर तर कधी मूल
पण काम नाही विसरत
वरुन जरी दिसते मॅम
पण माय आहे उरात
तानूल्यासाठी ही तूटतो जीव
धडपडणार्या शहरात
उंच माझी आहे ध्येये
उंच माझ्या आकांक्षा
आकाशाला घालेल फेरा
विस्तारून माझ्या कक्षा
तोडली आहेत आता
मी मनूस्मृतीची बंधने
हरेक क्षेत्र केले काबीज
अन हीनतेची कूंपने
तंत्रज्ञानातली भरारी माझी
पण काळजी संसाराची वाहाते
पोहचली जरी यशोशिखरावर
नजर पायथ्याशी राहते
नजर पायथ्याशी राहाते
