STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Others

4  

Sheshrao Yelekar

Others

आजची बातमी

आजची बातमी

1 min
194

आजची बातमी

ताजी हो ताजी

उद्यापासून लॉक डाउन 

भाजी घ्या वो ताजी


मेथी पालक आनली

वाढविलं रक्त

कोरोना महामारीत

नियम पाळावे सशक्त


वांगा आणि गोभी

आज आहे स्वस्त 

कामचुकार लोकांना

हे दिवस वाटतात मस्त


टमाटे आणि मिरची

दिवस आले चटणी भाकरीचे

सांभाळून राहा घरात

दिवस आले मरीचे 


काय सांगू मित्रांनो

भेटीगाठी सोडू

जीवन वाचलं तर

पुन्हा नव्या नाती जोडू


जीवन वाचविण्यासाठी

योगाची कास धरु

सात्त्विक जीवन पद्धती

शुद्ध आहार घेऊ



साहित्याला गुण द्या
लॉग इन