STORYMIRROR

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

आजचा विषय - अंधश्रद्धा

आजचा विषय - अंधश्रद्धा

1 min
252

विज्ञानाच्या नव्या युगातही

बुवा भाजतात आपली पोळी

अंधश्रद्धेच्या नादात लोकांच्या

सुखी या संसाराची होते होळी


माणूस पोहोचलाय चंद्रावर

तरीही सुवासिनी करी उपास

भाऊ मानुनी त्याला आजही

नैवेद्याचा दाखवती गोड घास


वैज्ञानिक देतात खुप पुरावे

तिथल्या माती हवामानाचे

भाऊ मानून भोळ्या बहिणी

औक्षण करतात सणासुदीचे


काळे मांजर घूबड न् गाढव

देवाजीचीच सारी ही लेकरे

कोण शुभ नि अशूभ ठरवून

खातात मुके जीव ते ठोकरे


बुवाबाजी करणी मांत्रिकही

घेती याअंधविश्वासाचा फायदा

फसवून ठकवून पाप करवतात

पोलिस शिकविती त्यांना कायदा


Rate this content
Log in