STORYMIRROR

Nandini Menjoge

Others

3  

Nandini Menjoge

Others

आज तू घे भरारी ||

आज तू घे भरारी ||

1 min
274

भोळ कुंपण समाजाचं तोडून 

वाईट रूढींचा कडेलोट करून 

आज तू घे भरारी ||

गैरसमाजाचा पूर्णविराम लावून 

गैर परंपरेच्या सीमा मोडून 

आज तू घे भरारी ||

आधुनिकतेच अफाट आकाश 

पंखांचा व्हावा मुक्त विहार 

आज तू घे भरारी ||

जागून स्त्री शक्तीस तू आज 

मोडून अवघ्या आव्हानांस 

आज तू घे भरारी ||

पुनर्जन्म स्त्रीचा, पराक्रमास जीव नमला 

जीवश्रुष्टीस दिपवण्या सक्षम उर भरला 

आज तू घे भरारी ||



Rate this content
Log in