STORYMIRROR

Sandeep Dhakne

Others

4  

Sandeep Dhakne

Others

आज पुन्हा

आज पुन्हा

1 min
381

रिमझिम बरसणारा पाऊस

आज दिवसभर बरसला

तुझ्या आठवणीसाठी जीव

आज पुन्हा एकदा तरसला ||


कोसळताना पाऊसधारा

मी पाऊस पिऊन घेतला

तुझ्या आठवणीत रमताना

आज पुन्हा श्वास घेतला ||


चिबं भिजताना पावसात

कळला नाही डाव मजला

तूझ्या अश्रुच्या आठवणीत

आज पुन्हा जीव भिजला ||


ओल्या मातीच्या कणाला

तुझा सुगंध कळला 

तुझ्या परतीच्या वाटेकरिता

आज पुन्हा पाऊस थाबंला ||


Rate this content
Log in