आईची व्यथा
आईची व्यथा
(मुलगी सासरी जाते)
आला दिवस हा तुझा जाण्याचा
डोळे माझे अचानक पाणावले
नकळत डोळ्यातील आसवे
गालावरी माझ्या ओघळले
जाणार तू माहिती आहे मला
मन माझं झालं गं कासावीस
जणू काही या शुभ्र आकाशात
नभ हे उतरू आलं
जाताना मला उगाच वाटलं
डोळे भरून एकदा तुला बघावं
घालवलेले क्षण तुझ्यासवे
डोळ्यात बंदिस्त मी करावं
आज तू निघताना
जिवाच्या आकांताने मनात मी रडले
मनातले अश्रू तुज दिसले
म्हणून का तू मला वळून पाहिले
जाताना तुझे डोळे मज
बरेच काही बोलून गेले
मनातले गुज अलगद
ओठांवर माझ्या आले
तू आज जाते म्हणताना
डोळे माझे सहजच
अचानक पाणावले
डोळ्यातील अश्रू
गालावरी ओघळले
