आईच घर
आईच घर
आई एक नाव असतं
जे नाव घेतल्यावर आपल्याला ऊर्जा मिळते
नसते घरात आई तेव्हा एकटेपणा वाटतो, असल्याने आईच्या घरालाही
आधार किती वाटतो
घर आईचं असतंच किती सुंदर
आईविना घराला नसतच घरपण ,
भूक लागली तर वेळेवर खायला करून देते
भूक लागली असेल ना?
आई चा हा शब्द आपली भूक भागवून नेते
किती सुंदर असतं ना आईचं घर
जिथे राहत नाही कुणीच उपाशी
दारावर येणाऱ्या कुत्र्याला ही
पाठवत नाही पोळीनिशी
कधी दूर असलो शिकायला तर
आई विना राहावं लागतं
कुटुंबातल्या सर्वांना फक्त आठवाव लागत
भूक लागली तर
स्वयंपाक बनवायचा कंटाळा तिथे येते
तेव्हा आईच्या घराची आठवण येते
जिथे म्हणते आई भूक लागली असेल ना
थांब पटकन खायला करून देते
आठवतात ते दिवस जेव्हा दूर राहायला लागतो
त्या सारख जगणंच नाही कुठे ज्याला आपण
आईचं घर मानतो
