आई
आई


आई माझी छान
जसे गंगेचे स्नान !
संसारात असे नेहमी
सदा विरक्तीचे ध्यान !!
आई माझी छान।
घेई नसीचा स्वास
परमार्थच्या ध्यानी।
होई लिन सदा !!
भाळी कुंकुवाचा मळवट
त्यावरी त्यागाची विभूती !
होता दर्शन तयेचे
प्रसन्न होई मन सदा !!
आई माझी प्रेरणा
तिची असे साधना !
नको होऊ कमजोर
बाळ माझा लई गुना !!
आई माझी छान
नेहमी ईश्वराचे ध्यान !!
मोह-आसक्ती सोडूनही
केला भवसागर पार !!