आई
आई
1 min
40
माझी आई माझ्या
साठी आहे आदर्श
संकटांना तोंड देते
सदैव ठेवुनी हर्ष
वडील गेल्यानंतर
आमच्यासाठी झाले
वडील आणि आई
जपणे कठीण वाटले
परंतु आमचे दवाखाने
लग्न एकटीनेच
ड्युटी करून केले
सहारा ना कुणाचाच
शेती पण आहे घरी
तेही लक्ष द्यायची
त्यावेळी नव्हती सुविधा
काळजी ना घे स्वतःची
तब्येतीची तिने
केव्हाच स्वतःची
घेतली खबरदारी
आम्हाला लगेच न्यायची
