आई
आई
1 min
19
आई असते एक मैत्रीण
जीवाभावाची सखी सोबतीन
कधी हितगुज करणारी
कधी अलगुज गाणारी
कधी खडे बोल सुनावणारी
कधी मायेने समजावणारी
धगधगत्या उन्हात ती सावली सारखी
रिमझीम पावसात ती वा-यासारखी
कुडकुडत्या थंडीत ती उबदार धुक्यासारखी
वाळलेल्या फांदीवर हिरव्यागार वेलीसारखी
आई म्हणजे मांगल्याची मुर्ती
आई म्हणजे वात्सल्याची किर्ती
आई म्हणजे साक्षात ईश्वर
विधात्याचे शिल्प सुंदर.
