STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

आई

आई

1 min
369

ती एक प्रेरणा होती,

कर्मयोगी होती,

अंधाराला प्रकाश होता,

ती ज्ञानज्योत होती,

धाडसी होती, ती

ती एक प्रेरणा होती,

आई माझी.


दुःख सोसले, सुख अनुभवले,

कामाचा हात होता,

कुटूंबाचा व्याप होता,

उत्साही हसरा चेहरा,

ती एक प्रेरणा होती,

आई माझी.


मन निर्मळ नितळ होते,

गावात नाव होते,

अज्ञानाशी सज्ञान देई,

क्षण आनंदाचे होते,

सावधान असे,

भीती तीज नसे,

सत्कर्म करावे,

उदास ना व्हावे,

असावे आनंदी देव कृपे

ती एक प्रेरणा होती,

आई माझी.


मन गोविंदे भरावे,

वाचा विठ्ठले बोलावी,

काने ऐकावे नेत्री पहावे,

विठ्ठल रुप.

काळ शांतीने सारावा,

वेळोवेळी, बोलावा,

विठ्ठल विठ्ठल.

ती एक प्रेरणा होती,

आई माझी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन