आई
आई
1 min
239
देह झिजवे सर्वांपाय
ऐसी मूर्ती होणे नाय,
ठेच लागताच ओठी येई
नाव तिचे आहे माय...||१||
ती नसता घर निराधार
तेही शोधे तिचाच आधार
ऐसी मूर्ती दूसरी होणे नाय
म्हणतो जिला आपण माय...||२||
जन्म देऊनी बाळा
भोगे ती सगळ्या झळा,
जन्मदाती ती होती आय
म्हणतो जिला आपण माय...||३||
दुःख झाले कितीही तरी
पाडू नये तिच्यात दरी
पुन्हा मिळे ना ऐसी माय
स्वर्ग भासे धरता तिचे पाय...||४||
वंदन माझे या मूर्तीला
माय नाव वसे कीर्तीला
अमर ऐसी तिची कीर्ती राय
म्हणतो जिला आपण आपली माय...
म्हणतो जिला आपण माय...||५||
