STORYMIRROR

Latika Choudhary

Others

4  

Latika Choudhary

Others

आई

आई

1 min
27.7K


काय वाचू देवपोथी,पुराण आणि गाथा

माझ्या करिता गीता,माझ्या मायची कविता

झेली संकटाचं ऊन,देत पिलाला सावली

पाही सपन जागत,रात डोळ्यात माऊली

झाकी गाठ पदराची,बांधी गाठोड्यात दुःख

देह चंदन झिजता ,लाभे कणभर सुख

जग वैशाखाचं ऊन,मन तापली धरती

अंधाऱ्या संसारात ,नित जळली आरती

माय आभाळाचं मन,देह सागर सरिता

मुखी सुखाचा बहाणा,जणू लेकरा करिता

तुझ्या देहात नांदतो ,माझ्या प्राणाचा अंकुर

पायाला ठेच माझ्या ,पण तुझा कापे उर

माय गेली वैकुंठात ,संगे पोटातलं दुःख

माय पोरकी मी झाले, कुठे शोधू तुझे मुख !


Rate this content
Log in