आई..
आई..
1 min
216
आईची गावी महती
धन्य माय माऊली ती,
आई तुझे गुणगान,
सांग गाऊ रोज किती!
तीच जन्म देई बाळा
तीच दावी दुनिया ही,
नऊ मास नऊ दिस
सांभाळी उदरी आई.!
सांभाळून उदरात
सोसून प्रसूती कळा,
जीवापाड जपूनिया
आई जन्म देई बाळा!
आई आईच असते
आईची माया ही थोर,
कोणी फेडणार नाही
जन्मोजन्मी उपकार.!
आई विना जगी नाही
दुसरा कोणता देव,
आईसाठी माझा जीव
आई माझं खरं विश्व.
आई तुझ्या पोटी मी ग
जन्म पुन्हा ही घेईन,
गाईन तुझी आरती
उपकार मी फेडीन.!
